शिरोलीतील विद्या मंदिर क्रमांक तीनचे पारितोषिक वितरण

शिरोलीतील विद्या मंदिर क्रमांक तीनचे पारितोषिक वितरण

शिरोली विद्यामंदिरमध्ये स्नेहसंमेलन
शिरोली पुलाची : विद्यार्थ्यांनी खेळ, मनोरंजन आणि अंगभूत कलेला वाव देतांना अभ्यासालाही महत्त्‍व द्यावे. परिस्थितीचा कधीही विचार न करता संघर्षाची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळते. प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशाचा आनंद जगावेगळा असतो. त्यामुळे मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्यासाठी धडपड करा, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या कमल कौंदाडे यांनी केले. येथील विद्या मंदिर क्रमांक तीनमध्ये स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आण्णासो सावंत होते. या वेळी सतीश पाटील, माजी मुख्याध्यापक महावीर आलमान, प्रा. मोंगले, माजी ग्रामपंचायत सदस्या पुष्पाताई पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्या मनीषा संकपाळ, महंमद महात, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण सोडगे, एकनाथ संकपाळ, केंद्रप्रमुख कृष्णात पाटील, दिलीप कौंदाडे, गणेश डांगे, राजेश जाधव, माधुरी सोडगे, शिल्पा वठारे, सुमन पोर्लेकर आदी उपस्थित होते. गोरखनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नईम अत्तार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com