
अंबपला स्पर्धांचे बक्षीस वितरण
02754
अंबप : एकता सखी मंचतर्फे घेतलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणप्रसंगी मनीषा माने आदी उपस्थित होते.
---------
अंबपला स्पर्धांचे बक्षीस वितरण
टोप, ता. १२ : सामान्य कष्टकरी महिला या घरातील काम करून कुटुंब सांभाळून मुलाबाळांना घडवण्यात समाजासाठी मोठे योगदान देत असतात. अशा महिला सर्वांसाठी प्रेरणा स्त्रोत असायला पाहिजे, असे मत जिल्हा परिषद माजी सदस्या मनीषा माने यांनी व्यक्त केले.
अंबप (ता. हातकणंगले) येथील एकता सखी मंचतर्फे घेतलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने होते. विजयसिंह माने यांनी मनोगत व्यक्त केले. अविनाश अंबपकर, असिफ मुल्ला, संगीता जाधव, ज्योती माने यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षीसे दिली. रेखा गायकवाड, सरिता कांबळे, जयश्री शिंदे, सरिता उंडे, दिपश्री माने, संगीता डोंगरे, महेश माने, उषाकाकी माने, वर्षाराणी माळी, शोभा पाटील, संगीता ऐद आदी उपस्थित होते.
विविध स्पर्धेतील विजेते असे, सुगरण युवती पाककला स्पर्धा : तनुजा वरपे, ऋतुजा चिबडे, सानिका निलजे. सुगरण सखी पाककला स्पर्धा- संगीता देसाई, अस्मिता जाधव, सुजाता माळी. खेळ पैठणीचा स्पर्धा : पुनम पाटील, कोमल हिरवे, सीमा जाधव, अश्विनी पाटील, सुनीता माने.