शिरोली : अमल महाडिक सभा

शिरोली : अमल महाडिक सभा

02797
शिरोली पुलाची : शेतकरी सभासद मेळाव्यात बोलताना माजी आमदार अमल महाडिक

...

‘राजाराम’ खासगी करण्याचा कुटील डाव

अमल महाडिकः शिरोली पुलाची येथील सभेत टीका

शिरोली पुलाची, ता. २१ : ‘विश्वासघाताचे दुसरे नाव म्हणजे सतेज पाटील असून, राजाराम साखर कारखाना खासगी करून तो कसबा बावड्यापुरता मर्यादित ठेवण्याचा त्यांचा कुटील डाव आहे,’ असा आरोप माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.
राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीची छत्रपती शाहू सत्तारूढ आघाडीच्या प्रचाराची सांगता सभा येथील छत्रपती संभाजीराजे चौकात झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच पद्मजा करपे होत्या.
अमल महाडिक म्हणाले, ‘माझ्या गावातील प्रत्येक सभासद म्हणून प्रत्येक व्यक्तीवर माझा विश्वास आहे. डी. वाय. पाटील कारखान्याच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्याकडे उत्तर नाहीत, तर आमच्या बाबतीत जे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले, त्याची उत्तरे आज आम्ही दिलेली आहेत. राजारामचे सभासद सात हजारावरुन तेरा हजार झाले आणि प्रत्येक पाच वर्षांनी कारखान्याची निवडणूक होते. मात्र, डी. वाय. पाटील कारखान्याचे सभासद कमी होत आहेत. यावरूनच त्यांची नैतिकता दिसून येते.राजाराम कारखान्याचा कारभार उत्तम प्रकारे सुरू आहे. याची सभासदांना खात्री आहे, म्हणूनच गेली अनेक वर्ष त्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण सभासदांच्या सातत्याने संपर्कात आहोत. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. १२२ गावांतील स्वाभिमानी सभासद छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीला विक्रमी मतदान करून, सत्तारूढ आघाडीला पुन्हा सेवेची संधी देतील.’
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘राजारामची निवडणूक एकतर्फी होत आहे, विरोधकांच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे. कारण विरोधासाठी व द्वेषासाठी त्यांनी ही निवडणूक लागली आहे. मात्र, जिल्ह्यातील एकही नेता त्यांच्यासोबत नाही. जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, आमदार प्रकाश आवाडे या सर्वांनी सत्ताधारींना पाठिंबा दिला आहे. यातूनच महाडिक यांचा राजाराममधील पारदर्शक कारभार दिसून येतो.’
यावेळी राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, राष्ट्रसेवा युवक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे, माजी सरपंच विठ्ठल पाटील, हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. सोनाली पाटील यांची भाषणे झाली.
भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, सत्यजित कदम, तुकाराम पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, सतिश पाटील, प्रकाश कौंदाडे, उपसरपंच अविनाश कोळी, लक्ष्मण कदम, सलीम महात, डॉ. सुभाष पाटील, महमंद महात, दिपक यादव, रणजीत केळुस्कर, मुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील, विश्वास महाडिक, तानाजी पाटील, मीनाक्षी पाटील, लक्ष्मण कदम, विठ्ठल पाटील, बालेचांद सनदे, यांच्यासह सत्तारूढ आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
...
स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कारखाना पाहिजे

‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक म्हणाल्या, ‘विरोधकांच्या गर्दीत सभासद शोधावे लागतात तर आमची फक्त सभासदांची गर्दी असते. बंटी पाटील इर्षेला पेटलेले आहेत, त्यामुळे आपण सतर्क राहूया. कारण विरोधकांना १७ एकरातील राजाराम कारखाना हा सहकार वाचवण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पाहिजे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com