
शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद खाडे
02801
प्रल्हाद खाडे
02800
बबन हुजरे
शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद खाडे
शिरोली पुलाची : येथील करवीर आणि हातकणंगले तालुका माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद खाडे, तर उपाध्यक्षपदी बबन हुजरे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संस्थापक एस. डी. लाड यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही. मसूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यामध्ये अध्यक्षपदी खाडे (बहिरेश्वर हायस्कूल ता. करवीर), तर उपाध्यक्षपदी हुजरे (हेर्ले हायस्कूल, ता. हातकणंगले) यांची बिनविरोध निवड झाली. नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार एस. डी. लाड व जी. पी. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी रघुनाथ पाटील, अशोक पाटील , रामदास पाटील, दीपक पाटील, रंगराव पाटील, दीपक शेटे, कृष्णराव पाटील, राजेंद्र जाधव, वर्षा पाटील, मुक्ता धुमाळ, नामदेव कांबळे, संदीप पाथरे, पंढरीनाथ कराडे व सुधाकर पिसे उपस्थित होते.