शिरोली : यात्रा लेख २

शिरोली : यात्रा लेख २

शिरोली बनविणार ‘स्मार्ट’

जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोली पुलाची गावाचा नियोजनबद्ध विकास सुरू असून, जिल्ह्यात शिरोली गाव स्मार्ट बनविण्याचा मानस पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच पद्मजा कृष्णात करपे व उपसरपंच अविनाश कोळी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. आमचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासकीय निधी आणून, तसेच वित्त आयोग व ग्रामपंचायत निधी आणि लोकसहभागातून गावातील अनेक कामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे लवकरच शिरोलीचा चेहरामोहरा बदललेला पाहायला मिळेल, असा विश्वास सरपंच करपे व उपसरपंच कोळी यांना आहे.
---------

औद्योगिक वसाहतीमुळे शिरोली पुलाची जगाच्या नकाशावर पोचले आहे. एमआयडीसीमध्ये कामानिमित्ताने राज्याच्या व देशाच्या विविध भागांतून नागरिक स्थायिक होऊ लागले आहेत. यामुळे शिरोलीचा विस्तार झपाट्याने झाला. मूळ गावासभोवती अनेक नागरी वसाहती वसू लागल्या. राष्ट्रीय महामार्ग व एमआयडीसीमुळे शिरोलीचे व्यावसायिक महत्त्व वाढले. हॉटेल, ट्रान्स्पोर्ट व्यवसाय, गोदाम असे अनेक लहान-मोठे व्यवसाय सुरू झाले. एकंदर शिरोली मोठे नगर बनले आहे. ८५ वर्षांपूर्वीची स्थापना असलेल्या शिरोली ग्रामपंचायत दप्तरी तीस हजार तर प्रत्यक्षात सुमारे ८० हजारहून जास्त लोकसंख्या आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदी काम करण्याची संधी मिळणे म्हणजे भूषण मानले जाते. शिरोलीची एकहाती सत्ता २०१२ ते १७ या केवळ पाच वर्षांसाठीच महाडिक गटाकडे राहिली. शिरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य शाहू आघाडीचे तर ग्रामपंचायतीवर सत्ता महाडिक गटाची असे. सत्ता केंद्राचे विकेंद्रीकरण शिरोलीकरांनी केल्याचे पाहायला मिळते. २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन शाहू स्वाभिमानी आघाडीची सत्ता आली. जिल्ह्याचे राजकारणाचे नेतृत्व करणारे माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक व जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची होम पीच म्हणून शिरोली गावाकडे पाहिले जाते आणि शिरोलीतीलच महाडिक गटाची पराभवाची जिल्ह्यात चर्चा झाली. या पराभवातून अनुभव घेत पाच वर्षं सत्ताधाऱ्यांना काम करण्याची संधी महाडिक आघाडीने दिली. निवडणुकीमध्ये जनतेची नळ ओळखत, योग्य नियोजन करत पुन्हा एकदा ग्रामपंचायतीमधील सत्ता महाडिक आघाडीने हस्तगत केली. निवडणुकीत महाडिक आघाडीने सरपंचपदासह १६ जागांवर विजय मिळवत एकतर्फी सत्ता मिळवली आहे.
शाहू आघाडीने शिरोलीच्या विकासाची केवळ आश्वासने दिली; मात्र प्रत्यक्ष एकही प्रकल्प पूर्ण केला नाही. त्यामुळेच सत्तांतर झाले. यामुळे महाडिक आघाडी जनतेला विश्वासात घेऊन कृतिशील विकासावर भर देणार असल्याचे सरपंच करपे व उपसरपंच कोळी यांनी सांगितले. विविध उपक्रम, विकासाची दृष्टी, पारदर्शक कारभार, तत्काळ निर्णयांमुळे ग्रामपंचायतीमधील कामाचा वेग वाढला आहे. गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासगंगा पोचली पाहिजे, यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असल्याचे सरपंच करपे व उपसरपंच कोळी यांनी सांगितले.

सरपंचांचा स्पष्टवक्तेपणा
ग्रामपंचायतीमध्ये महाडिक आघाडीची एकतर्फी सत्ता असल्यामुळे कामे त्वरित व्हावीत, ही लोकांची अपेक्षा आहे; मात्र या कामात सरपंच करपे व उपसरपंच कोळी यांनी स्पष्टवक्तेपणा ठेवला आहे. जे काम होणार, त्यांची रितसर प्रक्रिया पूर्ण करून करावी, असा मापदंड त्यांनी घातला आहे. जे काम होणार नाही, ते स्पष्टपणे त्यांना सांगितले जाते. ग्रामपंचायतीचे कर भरल्याशिवाय कोणताही दाखला न देण्याचे धोरण सरपंच करपे व उपसरपंच कोळी यांनी स्वीकारले आहे.

‘सरपंच आपल्या दारी’ उपक्रम राबवणार
प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सरपंच करपे व उपसरपंच कोळी त्या भागातील ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन थेट जागेवर जाऊन पाहणी करणार आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रशासनाला तेथेच सूचना करायच्या किंवा त्याबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहे.
शासनाच्या अंगणवाडीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे मत सरपंच करपे व उपसरपंच कोळी यांचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निधीतून अंगणवाडी स्मार्ट व डिजिटल करण्यात येणार आहेत.


महिलांसाठी विविध उपक्रम
महिला सक्षम झाली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभारावी यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाईल. महिलांच्या संगणक साक्षरतेसाठी ग्रामपंचायतीने शिबिर आयोजीत करण्यात येणार आहे. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याचे सरपंच करपे व उपसरपंच कोळी यांनी सांगितले.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन ग्रामपंचायतीतर्फे केले होते. कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सरपंच करपे व उपसरपंच कोळी यांनी सांगितले.
---
गावाचे संपूर्ण विकासाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वाटचाल सुरू आहे. प्राथमिक सुविधांसह आरोग्य, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, सहकारासह गावाच्या समृद्धीसाठी कटिबद्ध आहे.
- पद्मजा करपे, पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच
--
ग्रामपंचायत निधीसह शासनाच्या विविध योजनांतून विकासकामे प्रस्तावित आहेत. गावाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे.
- अविनाश कोळी, उपसरपंच


02824, 02825, 02826

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com