
पृथ्वीराज पाटीलकडून प्रकाश बनकर चितपट
02854
शिरोली पुलाची : येथील मैदानात पृथ्वीराज पाटील विरूध्द प्रकाश बनकर कुस्ती सामन्यातील एक क्षण.
02853
शिरोली पुलाची : विजयी पृथ्वीराज पाटील याला चांदीची गदा देताना राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक. या वेळी कृष्णात करपे, अविनाश कोळी, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज पाटीलकडून प्रकाश बनकर चितपट
शिरोलीत मैदान; साईड थ्रो डावावर विजय, चांदीच्या गदेसह दीड लाख जिंकले
शिरोली पुलाची, ता. १४ : येथील कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यास साईड थ्रो डावावर आस्मान दाखवत मानाची चांदीची गदा आणि दीड लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांच्या पृथ्वीराज बक्षीस दिले.
येथील श्री काशिलिंग बिरदेव यात्रा आणि पीर अमहदसो, पीर बालेचांदसो, उरुसानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. दसरा मैदानात कुस्तीचा थरार रंगला. या वेळी सत्तर चटकदार आणि प्रेक्षणीय कुस्त्यांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यामध्ये झाली. सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या या कुस्तीत दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत, डाव प्रतिडाव खेळले. १५ व्या मिनिटाला पृथ्वीराज पाटीलने बनकरला साईट थ्रो डावावर चितपट केले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन शशिकांत गार्डे आणि राष्ट्रकुल आखाड्याचा सुनिल खताळ यांच्यात झाली. ४५ मिनिटे ही कुस्ती सुरू होती. अखेरीस पंच सागर चौगुले यांनी सुनिल खताळ यास गुणावर विजयी घोषीत केले.
अतुल डवरी यांनी अवघ्या दोन मिनिटात रामा माने यास साईट सालटो डावावर चित्रपट करून कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. माजी उपसरपंच कृष्णात करपे, विठ्ठल पाटील, उपसरपंच अविनाश कोळी, प्रकाश कौदाडे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, महादेव सुतार, श्रीकांत कांबळे, महमद महात, विजय जाधव, शक्ती यादव, बाळासो पाटील, वडगांव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, राजेश पाटील, सतीश पाटील, सागर कौंदाडे, संजय पाटील, योगेश खवरे, संपत संकपाळ, संदिप तानवडे, सचिन गायकवाड, दिपक यादव, संदेश शिंदे, हिदायतुल्ला पटेल, बटील देसाई, ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम आदी उपस्थित होते. बटू जाधव, संभाजी पाटील यांनी निवेदक म्हणून काम पाहिले. बाळासाहेब मेटकर, बापू लोखंडे, के बी चौगुले, सागर चौगुले, जयदिप चव्हाण, सागर पाटील, बापूसो पुजारी यांनी पंच म्हणून काम पाहिले.