संकल्प माध्यमिक विद्यालयात उन्हाळी शिबिर संपन्न* *आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यात्या स्वरदा फडणीस यांच्या व्याख्यानाने झाली शिबिराची सांगता* | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकल्प माध्यमिक विद्यालयात उन्हाळी शिबिर संपन्न*    *आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यात्या स्वरदा फडणीस यांच्या  व्याख्यानाने  झाली शिबिराची  सांगता*
संकल्प माध्यमिक विद्यालयात उन्हाळी शिबिर संपन्न* *आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यात्या स्वरदा फडणीस यांच्या व्याख्यानाने झाली शिबिराची सांगता*

संकल्प माध्यमिक विद्यालयात उन्हाळी शिबिर संपन्न* *आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यात्या स्वरदा फडणीस यांच्या व्याख्यानाने झाली शिबिराची सांगता*

sakal_logo
By

00114
उन्हाळी शिबिर समारोपप्रसंगी बोलताना स्वरदा फडणीस. शेजारी इतर मान्यवर.

संकल्प विद्यालयात उन्हाळी शिबिर
सानेगुरुजी वसाहत : विद्यार्थ्यांनी विवेकानंदांचे आदर्श विचार प्रत्यक्ष कृतीत आणले तरच, खऱ्या अर्थाने आपणास विवेकानंद समजले असे होईल, असे मत स्वरदा फडणीस यांनी व्यक्त केले. राजोपाध्येनगरातील संकल्प माध्यमिक विद्यालयात उन्हाळी शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विवेकानंद केंद्राचे अरुण कुलकर्णी होते. केंद्राचे प्रचारक एकनाथ मोरे प्रमुख उपस्थित होते.
इंदूमती जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. वाय. पाटील, मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरात योगासने, प्राणायाम, संस्कार वर्ग, विविध प्रकारचे खेळ, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे व विविध तज्ज्ञांची व्याख्याने झाली. शारदा लुकतुके, डॉ. नारायण गोटे, संजय देशपांडे, तृप्ती पालेकर, आसावरी कुलकर्णी आदी उपस्थित होते. संकल्प माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश सुतार यांनी आभार मानले. शिबिरासाठी अवधूत कुलकर्णी, अनिता पाटील, सुषमा सुतार, प्रशांत चौगुले, संभाजी पाटील, दत्तात्रय पाटील, संभाजी चौगुले, यशवंत रानगे, राजेश कोंडेकर, सागर पाटील, यादु भोये, तेजस्विनी स्वामी, सुनीता पाटील, लता कोरे, पिंटू नाईक यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Ssh22a00058 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top