भोगावती काठी पुस्तकाचे प्रकाशन सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोगावती  काठी पुस्तकाचे प्रकाशन सोहळा
भोगावती काठी पुस्तकाचे प्रकाशन सोहळा

भोगावती काठी पुस्तकाचे प्रकाशन सोहळा

sakal_logo
By

00200
आपटे नगर ः ‘भोगावती काठी’ पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर.

‘भोगावती काठी’ पुस्तकाचे प्रकाशन
साने गुरुजी वसाहत, ता. १० : समाजभान जपत केलेले काम आत्मिक समाधान देते, असे मत कळंबा जेलचे अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी व्यक्त केले. आपटे नगर परिसरात विनायक कुलकर्णी यांच्या ‘भोगावती काठी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. जे. के. पवार, मानसी दिवेकर, ज्येष्ठ पत्रकार मोहन हवलदार उपस्थित होते.
दिवेकर म्हणाल्या, ‘भोगावती काठी’ या पुस्तकात केलेल्या वर्णनामुळे प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. पुस्तकातील प्रत्येक घटना वास्तव जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला उतरेल. पवार यांनी पुस्तकाची किंमत पुस्तकाच्या आशयावरून फारच कमी असल्याचे सांगितले.
पुस्तकाचे लेखक विनायक कुलकर्णी यांनी पुस्तक लिहिण्या पाठीमागचा उद्देश सांगितला. समाजातील अनेक लोक अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांच्यासाठी समाजभान जपण्याची गरज असल्याचे सांगितले. पुण्याचे बंडा जोशी यांचा हास्य पंचमी नावाचा विनोदी कार्यक्रम सादर झाला. माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, विशाल कुलकर्णी उपस्‍थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. अमर पाटगावकर यांनी आभार मानले.


फोटो ओळी ः ‘भोगावती काठी’ या पुस्तक प्रकाशनप्रसंगी डावीकडून राजू दिंडोर्ले, जे. के . पवार, कळंबा जेलचे अधीक्षक पांडुरंग भुसारे, विनायक कुलकर्णी, मानसी दिवेकर, कुलकर्णी आदी.

Web Title: Todays Latest Marathi News Ssh22a00106 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..