Tue, Jan 31, 2023

संकल्प माध्यमिक विद्यालयाचे यश
संकल्प माध्यमिक विद्यालयाचे यश
Published on : 19 December 2022, 1:35 am
‘संकल्प’च्या विद्यार्थ्यांचे यश
साने गुरुजी वसाहत, ता. १९ ः येथील संकल्प माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनपा व शहरस्तरीय विविध शासकीय क्रीडा स्पर्धांत यश मिळवले. पोदार हायस्कूल येथील १७ वर्षाखालील कॅरम स्पर्धेत मुलींच्या गटात उत्कर्षा गुरव हिने तर १४ वर्षांखालील गटात अदिती मस्के हिने यश मिळवले. त्यांची २१ डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरीत होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. जलतरण स्पर्धेमध्ये प्रज्योत गायकवाड याने २०० मीटर फ्रीस्टाइल जलतरणमध्ये यश मिळवले. त्याची इचलकरंजीतील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. क्रीडाशिक्षक आर. डी. पाटील व अवधूत कुलकर्णी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. ‘संकल्प’चे अध्यक्ष के. जी. पाटील व सचिव आनंदराव भोई यांचे प्रोत्साहन लाभले.