Sat, Jan 28, 2023

आदर्श प्रशालेत राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा*
आदर्श प्रशालेत राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा*
Published on : 30 December 2022, 2:27 am
आदर्श प्रशालेमध्ये ग्राहक दिन
सानेगुरुजी वसाहत ः जुना वाशी नाका येथील सरनाईक कॉलनीतील आदर्श प्रशालेत राष्ट्रीय ग्राहक सप्ताहानिमित्त ग्राहक जागृती कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे राजेंद्र वायंगणकर यांनी विद्यार्थ्यांना सजग ग्राहक बनणे आवश्यक असल्याचे सांगितले. वस्तू खरेदीवेळी वस्तूचे वजन, किंमत तसेच खराब होण्याची तारीख तपासून पाहण्याबाबत सूचना केली. खरेदीत फसवणूक झाली तर ग्राहक न्यायालयाकडे तक्रार करून समस्या निराकरण करू शकतो. सर्वांनी ग्राहक संरक्षण कायदा समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. मुख्याध्यापक आर. वाय. पाटील यांनी स्वागत केले केले. आर. बी. माने यांनी आभार मानले.