
कर्मवीर स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव सप्ताह सुरू
कर्मवीर स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव सप्ताह सुरू
सानेगुरुजी वसाहत : फुलेवाडी रिंग रोड येथील मॉडर्न शिक्षण संस्थेच्या शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल व कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर यांच्यातर्फे शिवजन्मोत्सव सप्ताह सुरू झाला. या अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा झाल्या. याला मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मकाळ व कार्यकाळ याविषयी मनोगत व्यक्त केले. संस्थापक डॉ. संदेश कचरे, सचिव डॉ. सायली कचरे, संस्था समन्वयक ज्योती लगारे, मुख्याध्यापिका जयश्री गुरव, पूनम मुसळे, अश्विनी पाटील, रूपाली निकाडे उपस्थित होते.
दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी चित्रकला स्पर्धा, १५ ला शिवकालीन वेशभूषा स्पर्धा, १६ ला एकपात्री अभिनय, एकांकिका, १७ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, १८ ला शिवरायांच्या जीवन कार्याविषयी निबंध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. रविवारी (ता. १९) सकाळी ९ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक येथे मिरवणुकीचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे संयोजन प्रियांका धनवडे, विशाल भोरे, रोहन शिंदे, मीरा चौगले, सेजल तराळ, सुरेखा काशीद, शुभांगी दमे, प्रियांका कोरवी, सपना खोराटे, रूपाली डोने, सीमा किल्लेदार, संदीप पाटील, आदित्य निकम, लता नायर आदींनी केले.