सावली केअर सेंटर मध्ये २६ फेब्रुवारीला कवी संमेलन* | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावली केअर सेंटर मध्ये २६ फेब्रुवारीला कवी संमेलन*
सावली केअर सेंटर मध्ये २६ फेब्रुवारीला कवी संमेलन*

सावली केअर सेंटर मध्ये २६ फेब्रुवारीला कवी संमेलन*

sakal_logo
By

सावली केअर सेंटरतर्फे कवी संमेलन
साने गुरुजी वसाहत ः कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २६ फेब्रवारीला सायंकाळी चार ते आठ या वेळेत सावली केअर सेंटर पीरवाडी (ता. करवीर) येथे कवी संमेलन आयोजित केले आहे. सेंटरच्या साहित्य कट्ट्या मार्फत मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हे कवी संमेलन होणार आहे. दोन कविता सादर करता येतील. प्रत्येक कवीला आठ मिनिटांचा वेळ असेल. कविता स्वरचित असावी. संमेलनात सहभाग घेण्यापूर्वी नावनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी शुल्क आकारले जाणार नाही. कविता सादर करण्यासाठी मानधन देण्यात येणार नाही. कविता सादरीकरणाबाबत आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. नवोदित व अनुभवी साहित्यिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सावली केअर सेंटरचे डॉ. किशोर देशपांडे यांनी केले.

,