Sun, May 28, 2023

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शुभेच्छा समारंभ
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शुभेच्छा समारंभ
Published on : 16 February 2023, 1:48 am
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शुभेच्छा समारंभ
साने गुरुजी वसाहत : साळोखेनगर रिंग रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून न्यू कॉलेजचे माजी उपप्राचार्य टी. के. सरगर होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के. खोंद्रे होते. या वेळी सरगर यांनी विद्यार्थ्यांना ‘दहावीनंतर पुढे काय?’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला सायन्स विभागासाठी लाकडी कपाट भेट दिले. जयंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जे. एस. कुंभार यांनी आभार केले. वर्गशिक्षक सचिन कांबळे व साईनाथ म्हाले यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.