सावली केअर सेंटरतर्फे मराठी भाषा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावली केअर सेंटरतर्फे
मराठी भाषा महोत्सव
सावली केअर सेंटरतर्फे मराठी भाषा महोत्सव

सावली केअर सेंटरतर्फे मराठी भाषा महोत्सव

sakal_logo
By

00498
सानेगुरुजी वसाहत : पिरवाडी (ता. करवीर) येथील सावली केअर सेंटरतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त गाण्याची मैफिल झाली. याप्रसंगी डॉ. किशोर देशपांडे व मान्यवर.


सावली केअर सेंटरतर्फे
मराठी भाषा महोत्सव
सानेगुरुजी वसाहत : पिरवाडी (ता. करवीर) येथील सावली केअर सेंटरतर्फे मराठी भाषा महोत्सव झाला. स्वरमल्हार या संस्थेचा मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. १८ कलाकारांनी यात सहभाग घेतला. उत्तम जोशी यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शास्त्रीय गायक विनोद डिग्रजकर, राजेंद्र मेस्त्री प्रमुख उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी साहित्यिक श्रीराम पचिंद्रे आणि संजीवनी तोफखाने यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील २४ कवींचे कविसंमेलन झाले. जुई कुलकर्णी आणि सुवर्णा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.
या सर्व कलाकारांना सावली केअर सेंटरतर्फे चिमण्यांची घरटी भेट म्हणून देण्यात आली.
तिसऱ्या दिवशी रंगमुद्रा पुणे आयोजित ‘सावरकरांचा मृत्यूशी संवाद’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. या प्रयोगाचे लेखन योगेश सोमण यांनी केले. दिग्दर्शन नरेंद्र आमले यांनी केले. उमेश घळसासी आणि नरेंद्र आमले यांनीही अभिवाचन सादर केले. या प्रयोगावेळी उद्योजक नितीन वाडीकर, संतोष पंडित, विनायक गोखले, वाघापूरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. किशोर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावली केअर सेंटरचे सौरभ शेवाळे, योगेश चव्हाण, ऋषिकेश डोंगळे, शिवानंद पुयम, कुणाल सरावणे यांनी विशेष परिश्रम घेतले.