विद्यार्थ्यांनी गिरविले पाककृतीची धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी गिरविले
पाककृतीची धडे
विद्यार्थ्यांनी गिरविले पाककृतीची धडे

विद्यार्थ्यांनी गिरविले पाककृतीची धडे

sakal_logo
By

00530
साने गुरुजी वसाहत : संकल्प माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाककृतीची अनुभूती घेतली.

विद्यार्थ्यांनी गिरविले
पाककृतीची धडे
संकल्प माध्यमिक विद्यालयात उपक्रम
साने गुरुजी वसाहत : वेळ सकाळची. मोकळ्या मैदानावर तीन दगडांच्या चुली पेटलेल्या त्यावर आमटीचं उकळणार आदण... बिर्याणीचा सुटलेला खमंग सुवास, तर चुलीला फुंकर मारून पेटवण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न त्यानंतर साधलेल्या पाककृतीचा आनंद. अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण पाककृतीचे अनुभव घेतले. निमित्त होते आपटे नगर परिसरातील संकल्प माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयम पाककृती बनवण्याच्या उपक्रमाचे. स्काऊट गाईड जलसुरक्षा या विषयांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विषय शिक्षक अवधूत कुलकर्णी यांनी याचे आयोजन केले होते.
इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये गट पाडून गटांतर्गत वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे काम केले. गटागटामध्ये पाककृती करत असताना प्रत्येकाने एकमेकांवर दिलेली जबाबदारी चोखपणे पाडली. यातून वेगळे करण्याचा संशोधनात्मक प्रयत्न व पदार्थ बनवताना कोणते पदार्थ किती घालावेत यामध्ये परस्परांमध्ये झालेला समन्वय या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना आनंद देणाऱ्या वाटत होत्या. बहुतांश विद्यार्थ्यांनी बिर्याणी, दम बिर्याणी, पावभाजी, भरलं वांग मसालेभात, शेवग्याची आमटी, तळलेले पापड, कांदा भजी, बटाटेवडे, सोलकडी शिरा, मिक्स व्हेज वाटाणे भात यासारखे पदार्थ बनवले. बनवलेले पदार्थ शिक्षकांना चवीसाठी देत असताना विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने सजवले होते. या उपक्रमाबद्दल पालकांतून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. यासाठी आर. डी. पाटील, अनिता पाटील, सुषमा सुतार, प्रशांत चौगुले, संभाजी पाटील, दत्तात्रय पाटील, संभाजी चौगुले व यशवंत रानगे यांनी विशेष सहकार्य केले.