पुढच्या वर्षी लवकर या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुढच्या वर्षी लवकर या..
पुढच्या वर्षी लवकर या..

पुढच्या वर्षी लवकर या..

sakal_logo
By

पुढच्या वर्षी लवकर या..

02883

पन्हाळा ः येथे बालाजी मंडळाने पारंपरिक मिरवणूक काढत गणेश मूर्तीचे विसर्जन केले.

पन्हाळ्यात बाप्पांना पर्यावरणपूरक निरोप
पन्हाळा : येथील बालाजी क्रीडा मंडळाने यंदा आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवाची प्रथा कायम राखली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली.
शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून मिरवणूक काढत मंडळाच्या ठिकाणीच काहिलीत मूर्तींचे विसर्जन केले. दरम्यान, मंडळाने प्लास्टिकमुक्तीसाठी कापडी पिशव्यांचे वाटप केले. प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. वृक्षारोपण केले. महिलांसाठी पारंपरिक स्पर्धा आयोजित करत, विजेत्यांना पैठणी भेट दिली. गणेशासमोर भजन ठेवून धार्मिक वातावरण निर्माण केले. दोन हजारांहून अधिक लोकांना महाप्रसादाचे वाटप केले. नियाज मुजावर, संदीप लोटलीकर, मिलिंद ढपाले, प्रशांत कोरे, अमित उरुणकर, प्रमोद धडेल, बाळासाहेब संकपाळ, मनोज नाखरे, संजय भोपळे, प्रवीण मिटके, शंतनू बांदिवडेकर आदींनी परिश्रम घेतले. तसेच बालाजी, मृत्युंजय, दत्त, राजे, एकात्मता, शिवरत्न शिवा काशीद, धर्मवीर, हिंदवी, शिवप्रेमी अशी ९ मंडळे गणेशोत्सव साजरी करू लागली. सगळीच मंडळे स्वच्छ पन्हाळा, सुंदर पन्हाळा, पर्या‌वरणाचा समतोल राखत गणेशोत्सवाचे पावित्र्य राखत आहेत.


सातवे परिसरात बाप्पांना निरोप
सातवे ः ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ अशा जयघोषणा गुलालाची उधळण आणि ढोल-ताशे व बँन्जो च्या निनादात १० दिवसांच्या सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. सातवे परिसरात सकाळी अकरा वाजल्यापासून सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे मिरवणुकीना सुरुवात झाली. या वर्षी गणेश मंडळानी सांऊड सिस्टीम, बँन्जो, तसेच फटाक्यांची आतषबाजीने भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. परिसरातिल अनेक मंडळांनी महाप्रसादाचे वाटप केले. सातवे येथील गणेश मंडळांनी गणरायाचा जयघोष शिवाजी चौक, भगतसिंग चौक मेन रोडवरून मिरवणूक काढून गणरायाचे विसर्जन केले.

बोरपाडळे परिसर
बोरपाडळे : बोरपाडळेसह शहापूर, मोहरे, माले, मिठारवाडी, आंबवडे, काखे आदी परिसरातील गणपती मूर्तींचे जल्लोषात रात्री उशिरापर्यंत विसर्जन झाले. ढोल, ताशे, बेंजो, लेझीम आणि इतर पारंपरिक वाद्याचा वापर झाला. काही ठिकाणी भर पावसात तरुणाई बड्या साऊंड सिस्टीमवर थिरकताना दिसत होती. आंबवडेत ‘एक गाव एक गणपती’ साजरा करत विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अनेक कलाकारांना निमंत्रित केले होते. परिसरातील बऱ्याच गणेश मंडळानी सामाजिक व प्रबोद्धानात्मक उपक्रम राबविल्याने नागरिकांतून त्या मंडळाबद्दल कौतुक केले जात होते.


आसुर्ले-पोर्ले परिसर
पोर्ले तर्फ ठाणे ः ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर लवकरया’च्या गजरात ढोल-ताशांच्या गजरात आसुर्ले-पोर्ले परिसरात आज सार्वजनिक गणेशांचे कासारी नदीत विसर्जन केले. परिसरात गौरी विसर्जनापासून दररोज एक-दोन मंडळाच्या गणेशाचे विसर्जन सुरू होते. विविध देखावे, सजीव देखावे पाहण्यासाठी गर्दी होत होती. अनेक मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते.

03455
कंदलगाव ः येथे पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन करताना एकता फ्रेंडस् सर्कल व सुपर तिरंगा मंडळ. (छायाचित्र : प्रकाश पाटील)

कंदलगावमध्ये पारंपरिक गणेश विसर्जन
कंदलगाव ः ना डॉल्बीचा आवाज, ना विद्युत रोषणाई, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात भक्तिमय वातावरणात कंदलगाव माळवाडी येथील एकता फ्रेंडस् सर्कल व चंद्राईनगर येथील सुपर तिरंगा मंडळाने साध्या पद्धतीने सार्वजनिक गणेशाचे विसर्जन केले. मिरवणुकीत अध्यक्ष रितेश पाटील, रोहन पाटील, श्रवण पाटील, अनिल किल्लेदार, अभिषेक निर्मळ, रत्नदीप पाटील, वसंत पाटील, राहुल पाटील, प्रणिल पाटील, राहुल कोरवी, शहाजी पाटील, अमर किल्लेदार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Svt22b00578 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..