सातवे येथे पिक परिसंवाद कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातवे येथे पिक परिसंवाद कार्यक्रम
सातवे येथे पिक परिसंवाद कार्यक्रम

सातवे येथे पिक परिसंवाद कार्यक्रम

sakal_logo
By

00807
सातवे : येथे नवीन वाण भात पिकाची पाहणी करताना पंचायत समितीचे अधिकारी व शेतकरी.

सातवेत पीक परिसंवाद
सातवे, ता. ९ : शेतीची सुपीकता टिकवण्याबरोबरच उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सुधारित वाणांचा वापर गरजेचा आहे, असे प्रतिपादन निर्मल सीड्सचे सौदागर चव्हाण यांनी येथे मार्गदर्शनप्रसंगी केले. येथील प्रगतशील शेतकरी लालासो जाधव यांच्या शेतात आयोजित पीक परिसंवादप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत, तालुका कृषी अधिकारी अविनाश मेश्राम, गुणनियंत्रण निरीक्षक शरद शिंदे, विभागीय व्‍यवस्थापक विलास जाधव, सरपंच अमर दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, ‘कमी शेतीत अधिक उत्पादनासाठी विकासाला पोषक अन्नद्रव्ये खतमात्रा याचा योग्य नियोजन असणे गरजेचे आहे.’
गटविकास अधिकारी सुभाष सावंत म्हणाले, ‘प्रयोगशील शेती करताना नवीन तंत्रज्ञान अवगत करावे.’ शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
संतोष पाटील यांनी प्रास्ताविकात कंपनीच्या उत्पादनांचा आढावा घेतला. प्रारंभी गावातून बैलगाडीची सवाद्य मिरवणूक काढली.
कार्यक्रमास पन्हाळा तालुका कृषी संघटना उपाध्यक्ष प्रशांत पाटील, आळोबानाथ कृषी सेवा केंद्राचे उमेश चौगुले, अवनी महिला प्रभाग संघ, शत्रुघन पाटील, जयभवानी पाणीपुरवठा चेअरमन सचिन जमदाडे, शिक्षक बँकेचे माजी संचालक खोत यांच्यासह कृषीसेवा केंद्रचालक, शेतकरी उपस्थित होते. व्‍यवस्थापक विलास जाधव यांनी आभार मानले.