श्री गंगा भागिरथी शिक्षण प्रसारक मंडळामुळे ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री गंगा भागिरथी शिक्षण प्रसारक मंडळामुळे ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड
श्री गंगा भागिरथी शिक्षण प्रसारक मंडळामुळे ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड

श्री गंगा भागिरथी शिक्षण प्रसारक मंडळामुळे ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड

sakal_logo
By

00818
सावर्डे ः येथे ऊसतोड मजुरांना फराळाचे वाटप करताना सदस्य.
-------------------

गंगा भागीरथीतर्फे फराळ वाटप
सातवे ः ऊसतोडणी व्यवसायामुळे घरापासून दूर असलेल्या ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने श्री गंगा भागीरथी शिक्षण प्रसारक मंडळ, सावर्डे-थेरगाव ता. पन्हाळा यांच्यामार्फत गरजू व कष्टकरी ऊसतोडणी कामगार कुटुंबांना फराळाचे वाटप झाले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा चंपाताई यादव, उपाध्यक्ष संपतराव पाटील, सचिव सुनील यादव, संस्थापक सदस्य राजाराम खामकर, सर्जेराव पाटील, प्रकाश पाटील रघुनाथ बच्चे, पांडुरंग बांदल, शहाजी पाटील, संभाजी बच्चे, प्रियांका यादव, जयसिंग बच्चे, अनिकेत जाधव, रंगराव महाडिक उपस्थित होते. यावेळी फराळानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला.