Tue, Feb 7, 2023

आमतेवाडी वाळकेवाडी चविष्ट वरणा सातवेच्या बाजारात दाखल
आमतेवाडी वाळकेवाडी चविष्ट वरणा सातवेच्या बाजारात दाखल
Published on : 13 December 2022, 12:08 pm
पावटा सातवेच्या बाजारात
सातवे ः डोंगराळ आणि ग्रामीण भागातील अस्सल चवीचा आमटीचा आवडता पावटा सातवेच्या आठवडी बाजारात दाखल झाला. येथील पावटा (वरणा) बिनपाण्याचा असल्याने त्या वरण्याला मेजवाणीला लाजवेल अशी चव असते. चवीच्या वरण्याला खरेदीसाठी लोकांची जास्त गर्दी होते. प्रतिकिलो १२० ते १३० रुपये दराने आमतेवाडी, वाळकेवाडी, शिंदेवाडीचा पावटा विकला जातो. संबधित मित्रमंडळी, पाहुण्यांना पावटा भेट म्हणून दिला जात आहे.