पंढरपूर-हुबळी गाडी 14 जुलै पर्यंत धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंढरपूर-हुबळी गाडी 14 जुलै पर्यंत धावणार
पंढरपूर-हुबळी गाडी 14 जुलै पर्यंत धावणार

पंढरपूर-हुबळी गाडी 14 जुलै पर्यंत धावणार

sakal_logo
By

पंढरपूर-हुबळी गाडी
१४ जुलैपर्यंत धावणार
मिरज, ता. १२ : आषाढी एकादशी निमित्त कर्नाटक-महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी हुबळी विभागाकडून धावणारी हुबळी-मिरज-पंढरपूर आणि पंढरपूर मिरज-हुबळी गाडी १४ जुलै पर्यंत धावणार आहे. यापूर्वी हुबळी विभागाकडून १० जुलै या एक दिवसासाठी सोडलेल्या या आषाढी विशेष गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाडीमध्ये दहा स्लीपर कोच आणि सहा जनरल बोगी असणार आहेत. ही गाडी हुबळी येथून पहाटे ३ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोचेल; तर पंढरपूर येथून दुपारी एक वाजता सुटेल आणि हुबळी येथे त्याच दिवशी रात्री ११ वाजता पोचेल. या गाडीला धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर, बेळगाव, सुळेभावी, सुलधाळ, पाच्छापूर, गोकाक रोड, घाटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द, शेडबाळ, विजयनगर, मिरज, आरग, कवठेमहांकाळ, जत रोड, सांगोला आदी थांबे देण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Tlk22b03504 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..