माळेवाडीत चार कुत्र्यांवर बिबट्याचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेवाडीत  चार कुत्र्यांवर बिबट्याचा हल्ला
माळेवाडीत चार कुत्र्यांवर बिबट्याचा हल्ला

माळेवाडीत चार कुत्र्यांवर बिबट्याचा हल्ला

sakal_logo
By

बिबट्याने पाडला
दोन कुत्र्यांचा फडशा
दोन जखमी; वारणा कोतोली परिसरात वावर
तुरुकवाडी, ता. ७ : वारणा कोतोली पैकी माळेवाडी (ता. शाहूवाडी) येथे बिबट्याने चार कुत्र्यांवर हल्ला केला. यात दोन ठार तर दोन कुत्री गंभीर जखमी झाली. माळेवाडी येथील रघुनाथ धोंडिबा माळी यांच्या अंगणात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याने झडप घातली. मारुती शामराव माळी यांच्या वडाचामाळ येथील वस्तीवरील दोन कुत्र्यांवर पहाटे बिबट्याने हल्ला करुन दोन कुत्र्यांना गंभीर जखमी केले आहे. माळेवाडीनजीकच शिराळेकरवाडी येथील गणेश लक्ष्मण शिराळेकर यांच्या कुत्र्याचाही बिबट्याने फडशा पाडला आहे. बिबट्याच्या दहशतीने कोतोली, तुरुकवाडी, आमेणी परिसरातील जनता भयभीत झाली आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, शाहूवाडीचे वन अधिकारी श्री. कांबळे यांनी पाणी आणि भक्ष्याच्या शोधासाठी वन्यजीव मानवी वस्तीकडे वळल्याचे सांगितले, तसेच जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन केले. गवा व अन्य वन्यप्राण्यांना हुसकावण्यासाठी शेतकऱ्यांनी कुत्री पाळली आहेत. मात्र दररोज बिबट्या कुत्र्यांवर हल्ला करीत आहे. बिबट्याच्या हल्ल्याने शेतकरी हतबल झाल्याचे माळेवाडीतील शेतकरी सागर माळी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Tur22b01113 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top