कोतोली - इंवलेवाडी वृक्षतोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोतोली - इंवलेवाडी  वृक्षतोड
कोतोली - इंवलेवाडी वृक्षतोड

कोतोली - इंवलेवाडी वृक्षतोड

sakal_logo
By

कोतोली-इंवलेवाडी वन क्षेत्रात
झाडांची कत्तल करणारा ठेकेदार पसार
तुरुकवाडी , ता. २४ : कोतोली-इंवलेवाडी (ता. शाहूवाडी) येथे वनक्षेत्रात बेकायदेशीर हजारो झाडांची राजरोसपणे कत्तल होत असल्याचे वृत्त दै. ‘सकाळ’मधून प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदार वृक्ष कटिंग करण्याचे साहित्य घेऊन पसार झाला आहे. ठेकेदाराला पडझड झालेल्या ७३० सुक्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची परवानगी होती; मात्र आजवर तीन हजार ओल्या व सुक्या झाडांची कत्तल केली आहे. उपवन संरक्षक काळे, वनक्षेत्रपाल अमित भोसले यांचे फोन नॉट रिचेबल असून, त्यांनी घटनास्ळी भेट देण्याचे टाळले आहे. बेकायदेशीर वृक्षांची बेमालूमपणे कत्तल करून माया गोळा करण्यासाठी फोफावलेल्या वृत्तीला आळा बसविण्यासाठी विविध निसर्गप्रेमी संघटना, सामाजिक, राजकीय संघटनांनी निषेध नोंदवून आंदोलन, उपोषण करण्याचे इशारे निवेदनांद्वारा दिला आहे. दरम्यान, सरपंच अशोक कुंभार, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम वनसमिती पदाधिकारी, भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी वृक्षतोड परिसराची पाहणी केली. वृक्षसंवर्धन करणे, वृक्षसंगोपन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. झाडांची ओल्या, सुक्या वृक्षांची कत्तल करणे शासनाचे धोरण नाही, असे कृत्य करणाऱ्याला शिक्षेची तरतूद आहे. या घटनेमागे मोठी साखळी सक्रिय असावी, असे मदर नेचर कॉन्झर्व्हेशन ट्रस्टचे नीलेश पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
.........
सकाळ बातमीचा परिणाम

Web Title: Todays Latest Marathi News Tur22b01124 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top