
वारणा माध्यमिक विद्यालयात सत्कार
सोंडोलीत गुणवंतांचा सत्कार
तुरुकवाडी : विज्ञान तंत्रज्ञान युगात विद्यार्थांचा निभाव लागावा, असे शिक्षण प्राथमिक स्तरावरचं देण्यासाठी शिक्षकांनी सक्रिय असायला हवे, असे मत जनसंपर्क अधिकारी सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. सोंडोली (ता. शाहूवाडी) येथील ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री वारणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत, यशवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व विविध कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष एस. आर. पाटील होते. ‘सकाळ’चे बातमीदार कृष्णा कांबळे, उपसरपंच आण्णासो पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, हणमंत जाधव, कमलेश पाटील, सत्यजित पाटील, सुरेश सावंत, मुख्याध्यापक संजय पाटील, बी. टी. पाटील, एस. बी. जाधव, डी. डी. पाटील, एस. बी. जाधव, दिलीप पाटील, बाबा माळी आदी उपस्थित होते. आभार एन. डी. जाधव यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Tur22b01146 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..