चांदोली धरण पाणलोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदोली धरण पाणलोट
चांदोली धरण पाणलोट

चांदोली धरण पाणलोट

sakal_logo
By

४२६१४
४२६१२
इचलकरंजीत पूरस्थितीकडे वाटचाल
पाणी पातळीत आठ इंचांनी वाढ; महापालिकेची आपद्‍कालीन यंत्रणा सतर्क
इचलकरंजी ः येथील पंचगंगा नदीतील पुराचे पाणी आता नागरी वस्तीनजीक आले आहे. दिवसभरात आठ इंच पाणी वाढले आहे. पावसाचा जोर वाढला तर नागरी वस्तीत पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे.
दिवसभरात सकाळच्या सत्रात पावसांने दडी दिली होती. मात्र सांयकाळी पून्हा पावसाचा जोर वाढला. तर पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी सकाळी ८ वाजता ६५ फूट ६ इंच इतकी होती. सांयकाळी ८ वाजता ६६ फूट २ इंचावर पुराची पातळी पोहचली होती. त्यामुळे पुराचे पाणी शेळके गल्ली, कटके गल्ली, बागवान पट्टी परिसराजवळ आले आहे. पुढील कांही तासांत पाणी या नागरी वस्तीत शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाकडून दिल्या आहेत. नदीकाठ परिसर पूर्णतः जलमय झाला आहे. काठावरील वरद विनायक मंदिर, रेणुका मंदिर परिसर पुराच्या पाण्याखाली आला आहे. हुपरीकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी आल्यामुळे हा मार्ग सध्‍या बंद करण्यात आला आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ६८ फूट आहे. इशारा पातळीच्या दिशेने पुराच्या पाण्याची वाटचाल सुरू आहे. तर पूर पाहण्यासाठी नव्या पुलावर मोठी गर्दी होत असून वाहतूक विस्कळीत होत आहे.

कृष्णा-पंचगंगेच्या पातळीत वाढ
कुरुंदवाड ः पावसाचा जोर ओसरला तरी धरणातील विसर्गामुळे कृष्णा, पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुरुंदवाड -शिरढोण, कुरुंदवाड- नांदणी, कुरुंदवाड अब्दुललाट असे तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. दरम्यान, आज सायंकाळी पंचगंगा नदीची पातळी ४१ फूट ८ इंच तर कृष्णेची पाणी पातळी ४२ फूट ७ इंच झाली आहे. राजापूर येथील कारदगे ओढ्यात पाणी आले आहे. जुन्या राजापूर रस्त्यावर पाणी आले आहे. पंचगंगा नदीक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने राधानगरीचे दरवाजे खुले झाल्याने तेरवाड बंधाऱ्याजवळ चार फुटाने पाणी पातळीत वाढ झाली आहे.
कुरुंदवाड अनवडी व कृष्णा नदी परिसर ,अकिवाट, राजापूर ,खिद्रापूर आणि शिरढोण परिसराची नदीकाठ परिसराची प्रांत अधिकारी डॉ. विकास खरात तहसीलदार डॉ. अपर्णा धुमाळ-मोरे यांनी पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.


वारणेच्या पातळीत वाढ
खोची ः खोची परिसरात वारणा नदीची पूरस्थिती स्थिर आहे. २४ तासात फक्त एक ते दीड फुट पातळीत वाढ झाली आहे. दिवसभरात काही वेळ रिमझिम पाऊस वगळता आज पुन्हा दिवसभर उघडीप मिळाली.त्यामुळे पाणी पातळीत वाढ होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.नदीकाठची पिके आज तिसऱ्या दिवशी पाण्याखाली आहेत. ती धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहेत. खोची ते दूधगाव दरम्यान नवीन पुलावरून वाहतूक सुरू होती.

चांदोलीतील विसर्ग कायम
तुरुकवाडी : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असल्याने धरणातील विसर्ग कायम ठेवला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरूच आहे. धरण ९१.३५ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रातून १०८८० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाणीपातळी ६९२. ५५३ मीटर तर एकूण पाऊस १८७० मिमी झाला. वीजनिर्मिती १६१६, वक्राकार दरवाजेद्वारे ७७८४ असा ९४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणानदी पात्रात सुरू आहे. कांडवण येथील धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

गगनबावड्यात पावसाचा पुन्हा जोर
असळज : बुधवारी कमी झालेल्या पावसाने आज दिवसभर पुन्हा जोर लावला आहे. आज सलग पाचव्या दिवशीही कुंभी नदीवरील शेनवडे, मांडुकली व वेतवडे बंधारे पाण्याखाली आहेत. आज सकाळपासूनच तालुक्यात जोराचे वारे वाहत असून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. जोराच्या वाऱ्यामुळे तालुक्यात विजेचा लपंडाव अद्यापही सुरूच आहे. गेल्या २४ तासात चोवीस तासांत तालुक्यात सरासरी ५३.५० मिमी पाऊस पडला. कुंभी धरण क्षेत्रात ९६ मिमि तर कोदे धरण क्षेत्रात ५७ मिमी पाऊस पडला आहे. कुंभी धरणातून ३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Tur22b01179 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..