चांदोली धरण शंभर टक्के भरले - विसर्ग वाढवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदोली धरण शंभर टक्के भरले - विसर्ग वाढवला
चांदोली धरण शंभर टक्के भरले - विसर्ग वाढवला

चांदोली धरण शंभर टक्के भरले - विसर्ग वाढवला

sakal_logo
By

चांदोलीतून ४५७३ क्युसेक विसर्ग
तुरुकवाडी : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरूच असल्याने धरण प्रशासनाने विसर्ग वाढवला आहे. पाणलोट क्षेत्रात गेले पाच दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. धरण शंभर टक्के भरले असल्याने आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने २५०० वरून ४५७३ क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. पाणलोट क्षेत्रातून ७३३१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पाणी पातळी ६२६ मीटर आहे. २४ तासांत ३७ मिमी, तर एकूण २६१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोकरुड - रेठरे बंधारा पाण्याखाली असून वाहतूक तुरुकवाडीमार्गे वळविली आहे.
कानसा, शाळी, कडवी, वारणा नदीचे पात्र धोका पातळीवर आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नदीकाठच्या जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन शाखा अभियंता गोरख पाटील यांनी केले आहे.

काळम्मावाडीत २३.१७ टीएमसी पाणी
राधानगरी ः तालुक्यात आज पावसाची उघडझाप राहिली. यामुळे धरणातील पाणी पातळी स्थिर राहिल्याने राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद झाला. दिवसभरात ३७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरण क्षेत्रावर ४१ मिमी पाऊस झाला असून, पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा विचार करता सायंकाळी पाच वाजता दुसरा वक्राकार दरवाजा किंचित उघडला आहे. यातून एकूण बाराशे, तर वीजनिर्मितीसाठी ९०० असा २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे. धरणात २३.१७ टीएमसी साठा झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Tur22b01202 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..