चांदोली धरण शंभर टक्के भरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदोली धरण शंभर टक्के भरले
चांदोली धरण शंभर टक्के भरले

चांदोली धरण शंभर टक्के भरले

sakal_logo
By

01426
१४२८
50554

चांदोली ओव्हर फ्लो
३४.४० टीएमसी साठा; वारणा काठासह सोलापुरातील दुष्काळी पट्ट्याला दिलासा
कृष्णा कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
तुरुकवाडी, ता. १६ : कोल्हापूर, सांगली जिल्हा हद्दीत वारणा नदीवरील चांदोली धरण शंभर टक्के भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गात चैतन्य पसरले आहे. काल बंद केलेले धरणाचे चारही वक्राकार दरवाजे आज पुन्हा उघडले गेले. धरणातून २५६१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
३४.४० टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या वारणा धरणाच्या साठ्याकडे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा पश्चिम भागातील औद्योगिक, शेतकरी व जनतेचे लक्ष वेधले होते. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी व एक महिना उशिरा होऊनही सुयोग्य नियोजनामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. गतवर्षी हेच धरण २१ सप्टेंबरला शंभर टक्के भरले होते. धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी २६८७ मिमी. पाऊस झाल्यानंतर धरणाने शंभरी गाठली. ३४.४० टीएमसी साठवण क्षमता असणारे धरण राज्यातील दोन नंबरचे मातीचे धरण आहे. पाणलोट क्षेत्रात सरासरी ३००० ते ५००० पर्जन्यमान राहते. २००५ चा अपवाद वगळता धरण कायम शंभरी ओलांडते. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह म्हैसाळ, मिरज, वाळवा भागांतील शेती, औद्योगिकरण व पिण्याच्या पाण्यासाठी धरणातील पाण्याचा उपयोग होतो. याशिवाय वारणा उजवा व डावा कालवा, वाकुर्डे उपसा जलसिंचन, कराळे उपसा जलसिंचनद्वारे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत असल्याने सर्वत्र हरितक्रांती झाली आहे. चांदोली व सोनवडे येथे दोन जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहेत.

तीन जिल्ह्यांतील जनतेचे लक्ष
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला मिरज येथून रेल्वेने पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. सिंचन, औद्योगिकीकरण, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात चांदोली धरणाद्वारे मिळत असल्याने सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील जनतेचे धरण शंभर टक्के भरण्याकडे लक्ष वेधले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Tur22b01203 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..