रेठरे मैदानात कुमार पाटील विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेठरे मैदानात  कुमार पाटील विजयी
रेठरे मैदानात कुमार पाटील विजयी

रेठरे मैदानात कुमार पाटील विजयी

sakal_logo
By

01524
वारणा-रेठरे (ता. शाहूवाडी) ः येथील कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या लढतीला सलामी देताना पंचायत समितीचे माजी सदस्य जालिंदर पाटील, पै. बंडा पाटील रेठरेकर, एल. बी. पाटील आदी.

वारणा-रेठरेत कुमार पाटील विजेता
श्री विठ्ठलाई, नवलाई, भराडीदेवी यात्रेनिमित कुस्ती मैदान

तुरुकवाडी, ता. १५ : वारणा-रेठरे (ता. शाहूवाडी) येथे श्री विठ्ठलाई, नवलाई, भराडीदेवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीमध्ये कुमार पाटील विजेता ठरला.
कुमार पाटील, शित्तूर व बालाजी बेटकरी, कोल्हापूर यांच्यात प्रथम क्रमांकासाठी लढत झाली. डाव-प्रतिडावाने कुस्ती १५ मिनिटे खडाखडीत सुरू होती. कुस्तीचा निकाल लागण्याची चिन्हे दृष्टिक्षेपात येत नसल्याने पंचांनी कुस्ती गुणावर घेतली. कुमार पाटील याने दुहेरी पट काढून गुण प्राप्त करून विजय मिळवला.
आखाडा पूजन पै. बंडा पाटील रेठरेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य जालिंदर पाटील, एल. बी. पाटील, प्रा. कृष्णा ठोंबरे, उपसरपंच प्रणय पाटील यांच्या हस्ते झाले.
द्वितीय क्रमांकासाठी सूरज पाटील व तेजस येळवी यांच्यातील लढत प्रेक्षणीय झाली. पाचव्या मिनिटास तेजसने घिस्सा डावावर सूरज पाटील याला चितपट केले.
तृतीय क्रमांकाची लढत दत्ता बाणकर व राहुल कोकरे यांच्यात झाली. दत्ताने सातव्या मिनिटास घिस्सा डावावर विजय मिळवला.
विजयी मल्ल पुढीलप्रमाणे - प्रदीप पाटील, सौरभ नांगरे, आदित्य पाटील, वैभव मुळीक, अमर पाटील, स्वीकार सावंत, प्रताप माने, शुभम पाटील, सुरेश जाधव, ओम पाटील, आबा जाधव, अनुरुद्ध शिंदे, अमोल पाटील.
विजेत्या मल्लांना उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, यात्रा कमिटी अध्यक्ष विष्णू दळवी, तुरुकवाडीचे सरपंच संजय माईंगडे, तंटामुक्तचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, दिनेश पाटील, लक्ष्मण महाराज, युवराज दळवी, अशोक पाटील, मगार केसरी समिंदर जाधव, ए. वाय. वडकर, बाळासो सोरटे, अविनाश जाधव, नाना पाटील, तानाजी जाधव, आनंदा मेस्त्री यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मैदानी पंच म्हणून शामराव जोंधळे, प्रकाश पाटील, अशोक पाटील, आनंदा पाटील यांनी काम पाहिले.
निवेदन कृष्णा चौगुले यांनी केले.