रेठरेत पदाधिकारी यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेठरेत पदाधिकारी यांचा सत्कार
रेठरेत पदाधिकारी यांचा सत्कार

रेठरेत पदाधिकारी यांचा सत्कार

sakal_logo
By

रेठरे वारणात शेतकरी मेळावा
तुरुकवाडी : देशाचा सर्वांगीण विकास साध्य करावयाचा असेल तर खेडी सक्षम हवीत, असे मत सरपंच प्रा. वंदना ठोंबरे यांनी व्यक्त केले. रेठरे - वारणा (ता. शाहूवाडी) येथे सत्कार समारंभ, शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शाहूवाडी पंचायत समिती माजी सभापती लतादेवी पाटील होत्या. सरपंच प्रा. ठोंबरे म्हणाल्या, ‘शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोचत नाहीत. निसर्ग दिवसेंदिवस बदलत असल्याने शेती संकटात आहे. शेती उत्पादनांना हमीभावाचा अभाव असल्याने खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही.’ यावेळी रेठरे ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांचा सत्कार जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, भारतीय मराठा महासंघाचे प्रवक्ते अनिल पाटील यांच्याहस्ते झाला. विजय परीट, संगीता जाधव, सिमला पाटील, आनंदा निकम, सविता सोरटे, शीतल कांबळे, सागर बच्चे, उत्तम माळी उपस्थित होते.