Mon, Sept 25, 2023

शाहूवाडी उत्तर भागात निवाराशेड
शाहूवाडी उत्तर भागात निवाराशेड
Published on : 15 April 2023, 5:26 am
शाहूवाडी उत्तर भागात निवारा शेडची मागणी
तुरुकवाडी : शाहूवाडी उत्तर भागातील एसटी थांब्यावर निवाराशेड उभारण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. शाहूवाडी उत्तर भागातील तुरुकवाडी, कोतोली, रेठरे, गोंडोली, मालेवाडी, सोंडोली, खेडे, शिराळे- वारुण, उखळू, विरळे, जांबूर, मालगाव, पळसवडे, कांडवण, आमेणी, काजू फाटा येथे एसटी निवाराशेड नसल्याने प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांना पावसात भिजत तर उन्हात शिजत एसटी बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. एसटी महामंडळाला प्रवासी हवेत; मात्र थांब्यावर प्रवाशांना निवारा शेडअभावी होणारा त्रास दिसत नसल्याबाबत प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित आगार व्यवस्थापकांनी आवश्यक ठिकाणी निवाराशेड उभा करावेत; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा रेठरे सरपंच वंदना ठोंबरे यांनी दिला.