चांदोली धरणात ४४.४२  टक्के पाणीसाठा

चांदोली धरणात ४४.४२ टक्के पाणीसाठा

01586

वारणा धरण पाणी साठा
...

चांदोली धरणात ४४.४२ टक्के पाणीसाठा

तुरुकवाडी : वारणा धरण प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे चांदोली धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने वारणा नदी लाभक्षेत्रातील जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळा अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना देखील चांदोली धरण जलाशयात १५.२८
टीएमसी पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा ८.४० टीएमसी आहे. पाणी पातळी २३७.८९ मि.मीटर, वीज निर्मिती १००४, वारणा डावा कालवा ३५०, वारणानदी १२५९ असा एकूण १६०९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण प्रशासनाने औद्योगिक, कृषी, पिण्याचे पाण्यासाठी वारणानदी, वारणा डावा व उजवा कालवा, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सातत्याने प्रवाहित ठेवल्याने गतवर्षीच्या तुलनेत सर्वच पिकांची स्थिती समाधानकारक आहे. गतवर्षी वारणा धरण प्रशासनाचे वारणा उजवा कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याने ऊस पिकांची वाढ समाधानकारक नव्हती. दरम्यान, ‘वारणा पाटबंधारे’ चे शाखाधिकारी गोरख पाटील म्हणाले,‘ वारणा धरणात पाणीसाठा मुबलक असला तरीदेखील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com