Thur, October 5, 2023

रेठरेत विनायक दळवी याचा सत्कार
रेठरेत विनायक दळवी याचा सत्कार
Published on : 8 June 2023, 1:15 am
रेठरेत विनायक दळवी याचा सत्कार
तुरुकवाडी : ग्रामीण भागातील युवकांमध्ये भरपूर ऊर्जा स्त्रोत आहेत. त्यांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे, असे मत पी. वाय. वडकरसर यांनी व्यक्त केले. रेठरे (ता. शाहूवाडी) येथे कै. दिनकर आदिक वाचनालय व विविध संस्थांतर्फे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. विनायक दळवी याची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रणय पाटील, जालिंदर जाधव, आनंद जाधव, उमेश दाष्टे, संभाजी इनामदार, रवींद्र जाधव, विक्रम पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. संपत पाटील, दीपक पाटील, भगवान जाधव, दिनकर पाटील, जालिंदर सु. पाटील, विजय परीट, युवराज पाटील, अमर भोसले उपस्थित होते.