स्कूल बस पाठीमागे घेताना अपघात ; पादचारी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्कूल बस पाठीमागे घेताना अपघात ; पादचारी ठार
स्कूल बस पाठीमागे घेताना अपघात ; पादचारी ठार

स्कूल बस पाठीमागे घेताना अपघात ; पादचारी ठार

sakal_logo
By

उजळाईवाडी ता १८
कंदलगाव ते कोगील खुर्द रस्त्यावरील ओढ्याजवळ रस्त्यावरून बस चालक बाळू तुकाराम गावडे (तामगाव) याने निष्काळजीपणे पाठीमागे न पाहता स्कूल बस पाठीमागे घेताना रस्त्यावरून जाणारे पादचारी दिलीप तुळशीराम साबळे (वय ४९ सध्या रा. विवेकानंद तालमी जवळ, कंदलगाव, मूळ गाव, गाडे गल्ली, उदलगाव, सांगोला) यांना जोराची धडक दिल्याने अपघातात दिलीप साबळे हे जागीच ठार झाले. सदर अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास झाला असून निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल बस चालक गावडे यांच्या विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे या अपघाताची फिर्याद उमेश निवास जाधव ( कोरीची ता. हातकलंगले) यांनी दिली असून अधिक तपास सहायक फौजदार जाधव करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ujl22b01328 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..