उजळाईवाडीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरट्यांवर वक्रदृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उजळाईवाडीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरट्यांवर वक्रदृष्टी
उजळाईवाडीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरट्यांवर वक्रदृष्टी

उजळाईवाडीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरट्यांवर वक्रदृष्टी

sakal_logo
By

02718
उजळाईवाडी ः ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.


३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची
आता उजळाईवाडीत नजर

उजळाईवाडी, ता. २४ ः उजळाईवाडी ग्रामपंचायतने पंधराव्या वित्त आयोगातून बसवलेल्या नव्या कोऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. याचा पोलिस तपासासाठी हातभार लागत आहे.
विविध ठिकाणी ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. सरकार चौक, तामगाव चौक, साई मंदिर, असोबा मंदिर, बेळगावकर गॅरेज, महामार्गावरील भुयारी मार्ग, मराठी शाळा, हायस्कूल यासह गावामध्ये प्रवेशद्वार व गावाबाहेर जाणारे रस्ते, विमानतळ रोड येथे कॅमेरे बसवले आहेत.
महामार्गालगत असणाऱ्या कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावरील उजळाईवाडीचे भौगोलिक महत्त्व विशेष असून ग्रामपंचायतीने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संपूर्ण उच्च दर्जाचे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामुळे अनेक गैरप्रकारांना आपोआप आळा बसण्यास मदत होईल. यासाठी ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे सरपंच सुवर्णा माने यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Ujl22b01335 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..