नाईट लँडिंग मार्ग निश्चिती, कार्गो सुविधा तातडीने सुरू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाईट लँडिंग मार्ग निश्चिती, कार्गो सुविधा तातडीने सुरू करा
नाईट लँडिंग मार्ग निश्चिती, कार्गो सुविधा तातडीने सुरू करा

नाईट लँडिंग मार्ग निश्चिती, कार्गो सुविधा तातडीने सुरू करा

sakal_logo
By

47504

विमानतळावर कार्गो सुविधा सुरू करा
मंत्री ज्योतिरादित्य यांना निवेदन; काँग्रेस आमदार शिष्टमंडळाशी विविध मुद्द्यांवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी, ता. ३ ः कोल्हापूर विमानतळावर कार्गो सुविधा सुरू करावी, वाहतुकीची नवी क्षेत्रं निश्‍चित करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन आज जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांनी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दिले. कोल्हापुरात नाईट लँडिंगला मान्यता दिल्याबद्दल श्री. शिंदे यांचे कोल्हापूरवासीयांतर्फे आभार मानले. श्री. शिंदे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
दरम्यान, विमानतळावर आमदार ऋतुराज पाटील, प्रा. जयंत आसगावकर व श्रीमती जयश्री जाधव यांनी भेट घेऊन निवेदन दिले.
नाईट लँडिंग सुविधेसाठी नाईट रुटची निश्‍चिती करावी, अशी मागणीही केली आहे. विमानतळ विकासासाठी आवश्‍यक सर्व निर्णय घेण्याचे आश्‍वासन श्री. शिंदे यांनी दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. श्री. शिंदे यांची आज हॉटेल सयाजी येथे भेट घेऊन विमानतळ विकासाबाबत चर्चा केली. विमानतळावरील नाईट लँडिंगसाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमानतळ प्राधिकरणाकडे माजी मंत्री सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
श्री. ज्योतिरादित्य शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नाईट लँडिंग मार्ग मिळालेला नाही. त्यामुळे कोल्हापुरात जाण्यासाठी व तेथून उड्डाण घेण्यासाठी नाईट लॅडिंग मार्ग निश्‍चित करावा, कार्गो सुविधा सुरू करावी, नागपूर, शिर्डी, गोवा, पुणे, जोधपूर, जयपूर, दिल्ली, नांदेड आणि मुंबई या मार्गांवर रात्री उशिरापर्यंतच्या उड्डाणांना मागणी आहे. त्यामुळे नवीन क्षेत्रे कोल्हापूर विमानतळाला द्यावीत, प्रशिक्षणार्थीसाठी एमआरओ फायलिंग स्कूलसाठी हॅन्गर सुविधा द्याव्यात, एअरबस ए बी ३२० प्रकारच्या विमानाचे संचलन करावे, बंगळुरू आणि अहमदाबाद सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

प्रमुख मागण्या अशा
कोल्हापूर-मुंबई मार्ग दुसऱ्या कंपनीला द्यावा
नांदेड-मुंबई-कोल्हापूर सेवा सुरू करावी,
आरसीएस मार्ग, फ्लाईट ऑपरेटरचे वाटप करावे

Web Title: Todays Latest Marathi News Ujl22b01375 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..