भाजी मंडई वरून गोशिमाच्या सभेचे ''गोकुळ'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजी मंडई वरून गोशिमाच्या सभेचे ''गोकुळ''
भाजी मंडई वरून गोशिमाच्या सभेचे ''गोकुळ''

भाजी मंडई वरून गोशिमाच्या सभेचे ''गोकुळ''

sakal_logo
By

02829

‘गोशिमा’च्या सभेत खडाजंगी
भाजी मंडईसह अन्य विषय कळीचा मुद्दा; ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळात
सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी, ता. २३ ः गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील भाजी मंडईमुळे संचालक मंडळ व गोशिमा बचाव कृती समितीत खडाजंगी झाली. कोल्हापूर इंजिनिअरिंग फाउंड्री क्लस्टरमधील अनागोंदी, संचालकांच्या नातेवाईकांना लाभ, फाउंड्री क्लस्टरला दिलेले २५ लाख रुपये यांसह डझनभर प्रश्न विचारत संचालकांना गोशिमा बचाव कृती समितीचे देवेंद्र दिवाण व उदय दुधाणे यांनी धारेवर धरले.
दरम्यान, बचाव समितीने धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्यामुळे न्यायप्रविष्ट बाब असल्याने खुलासा देणे उचित होणार नाही, असे सांगितले. सभेच्या परवानगीने कृती समितीला खुलासा वाचून दाखवला. यावर कृती समितीने आक्षेप घेत फाउंड्री क्लस्टर, भाजी मंडई व संचालकांच्या नातेवाईकांना लाभ याविषयीच्या उत्तरांनी समाधान न झाल्यामुळे गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
फाउंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी बचाव कृती समितीच्या पत्राला दिलेले उत्तर सभेत वाचून दाखवत असताना पाटील खोटे बोलत असल्याचा आरोप नितीन माने यांनी केला. ते खोटे बोलत असतील, तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करा, अशी मागणी कृती समितीने केली. आरोप-प्रत्यारोपामुळे गोंधळ वाढत असताना इतर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे निमंत्रित व प्रमुख पाहुणे राम भंडारी यांनी गोंधळाबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, योगेश कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांसमोरील गोंधळाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी फाउंड्री क्लस्टरचे संचालक सचिन शिरगावकर राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत असल्याचे सांगितले. त्यावेळी शिरगावकर यांनी शांततेने मार्ग काढून आरोपांबाबत पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करण्याचे आवाहन केले. आवाहनाला कृती समितीने व सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर सभा सुरळीत झाली.
संचालक लक्ष्मीदास पटेल, अजित आजरी, सुरजितसिंग पवार, जे. आर. मोटवानी, रणजित पाटील, सुनील शेळके, संजय देशिंगे, प्रसाद गुळवणी, राजेंद्र माळी, राजवर्धन जगदाळे, नचिकेत कुंभोजकर, शिवाजीराव सुतार, विज्ञानानंद मुंडे, मंगेश पाटील, अजय कुलकर्णी, रामचंद्र लोहार, सारंग जाधव, अमोल यादव सतीश माने, रणजित मोरे, नितीन माने, राजीव परीख व सभासद उपस्थित होते.

बदलांना सामोरे जा
आजच्या ३३ व्या वर्षी सर्वसाधारण सभेसाठी ए. के. पी. फाउंड्रीज बेळगावचे सीईओ राम भंडारी यांनी मार्गदर्शन करताना औद्योगिक प्रगतीच्या या पाचवा टप्पा वेगाने बदल घडवणारा असून कुशल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोट्स व ऑटोमेशनचा असून अचूकतेमुळे झिरो वेस्टेजकडे वाटचाल करीत आहोत. अशा तंत्रज्ञानाने समृद्ध कुशल मनुष्यबळाची गरज असेल, तसेच असे कर्मचारी पूर्वीसारखे तडजोड न करता चांगल्या सुविधांची मागणी करणार असल्याचे सांगितले. बेळगाव फाउंड्री क्लस्टरच्या वाटचालीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Ujl22b01394 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..