उजळाईवाडी भागात घरफोड्यांचे सत्र सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उजळाईवाडी भागात 
घरफोड्यांचे सत्र सुरूच
उजळाईवाडी भागात घरफोड्यांचे सत्र सुरूच

उजळाईवाडी भागात घरफोड्यांचे सत्र सुरूच

sakal_logo
By

उजळाईवाडी भागात
घरफोड्यांचे सत्र सुरूच
तीन दिवसांत चार घरे लक्ष्य; भीतीचे वातावरण

पोलिसांसमोर आव्हान
सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी, ता. २९ ः गावात घरफोड्यांचे सत्र सुरू असून, सलग तिसऱ्या रात्री घरफोड्यांचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी येथील पसरिचानगरमधील घर फोडून ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. त्या आधी सरकार चौक, इंडो काउंट कॉलनी, श्रीराम कॉलनी येथील घरे चोरट्यांनी लक्ष्य केली होती. गेल्या तीन दिवसांत चोरट्यांनी तब्बल पाच लाखांपर्यंतचा ऐवज चोरून नेत पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः चोरट्यांनी पसरिचानगर येथील श्रीमती कल्पना अर्जुन देवकुळे यांच्या बंद घर फोडले. घर ता. २२ ते २९ दरम्यान बंद होते. चोरट्यांनी घराचा कडी, कोयंडा उचकटून तिजोरीमधील सोन्याचे ६० हजार रुपयांचे दागिने व रोख दहा हजार रुपये चोरून नेले. दोन दिवसांपूर्वी सरकार चौक व इंडो काउंट कॉलनी येथे घरफोड्या झाल्या. शरद किशोर इंगवले (प्लॉट नंबर ८५/३४ श्रीराम कॉलनी) यांच्या बंद घराचा कडी, कोयंडा उचकटून ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये रोख रक्कम चोरली. सलग घडणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सर्व घरफोड्यांची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यामध्ये झाली असली तरी अद्याप चोरट्यांचा धागादोरा मिळालेला नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक प्रणाली पवार, सहाय्यक फौजदार सनदी, खोत यांचे पथक चोरीचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

पोलिसांना चकवा
उजळाईवाडी येथील सरकार चौक, इंडोकाउंट कॉलनी, श्रीराम कॉलनी परिसरात सहाय्यक निरीक्षक अविनाश माने यांच्यासह सहा अंमलदार व अन्य पोलिस गस्त घालत असताना चोरट्यांनी पसरिचानगर येथे घरफोडी केली.