नेर्लीतील शेतकऱ्यांनी अनुभवली आधुनिक शेती शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेर्लीतील शेतकऱ्यांनी अनुभवली आधुनिक शेती शाळा
नेर्लीतील शेतकऱ्यांनी अनुभवली आधुनिक शेती शाळा

नेर्लीतील शेतकऱ्यांनी अनुभवली आधुनिक शेती शाळा

sakal_logo
By

02882
तळसंदे ः येथील अभ्यास सहलीसाठी उपस्थित शेतकरी.
..........................
कृषी सहलीचे आयोजन
उजळाईवाडी ता. १३ ः शेतीतील आधुनिक तंत्र अवगत होण्यासाठी ग्रामपंचायत नेर्ली - विकासवाडीतील ११० शेतकऱ्यांच्या अभ्यास सहलीचे आयोजन डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ तळसंदे व सीमा बायोटेक, तळसंदे येथे भेट दिली. भेटीदरम्यान तज्ञांकडून आधुनिक शेतीसंबंधी विविध विषयांची माहिती घेतली. प्रा. दीपक पाटील प्रा. सावंत, प्रा. सूर्यकांत यांनी मार्गदर्शन करत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सीमा बायोटेकची कृषीतज्ज्ञ विश्वास चव्हाण, धुमाळ व विकास पाटील यांनी समृद्ध शेतीचे तंत्र व मंत्र विशद केले. यावेळी तज्ञांना अनिल सावंत व भगवान पाटील यांनी प्रश्न उपस्थित करीत शेतीप्रती जिज्ञासा दर्शवली. अभ्यास दौऱ्याचे नेटके नियोजन गोकुळचे संचालक व लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील व ग्रामसेवक हासुरे यांनी केले. आमदार सतेज पाटील, कुलपती डाॅ संजय डी. पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांचे सहकार्य मिळाले. हंबीरराव पाटील, राहुल पाटील, जनार्दन पाटील, अमर पाटील, रायगोंडा पुजारी, विठ्ठल पुजारी, संदीप कदम, प्रदीप चौगुले, बाळासो चौगुले, बंडा सिद्धनेर्ले आदी उपस्थित होते.