एस फोर ए चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक बांधिलकीचे कार्य कौतकास्पद: आम: जयश्री जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एस फोर ए चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक बांधिलकीचे कार्य कौतकास्पद: आम: जयश्री जाधव
एस फोर ए चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक बांधिलकीचे कार्य कौतकास्पद: आम: जयश्री जाधव

एस फोर ए चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक बांधिलकीचे कार्य कौतकास्पद: आम: जयश्री जाधव

sakal_logo
By

02892
उजळाईवाडी ः येथे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करताना आमदार जयश्री जाधव. सोबत अरुणिमा माने व कार्यकर्ते
-------------
उजळाईवाडीत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

उजळाईवाडी, ता. २४ ः समाजोन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील एस फोर ए चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक बांधिलकीचे कार्य कौतकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले.
त्या एस फोर ए चॅरिटेबल ट्रस्टतर्फे घेतलेल्या झिम्मा-फुगडी व गणेशोत्सव स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभप्रसंगी बोलत होत्या. यावेळी झिम्मा फुगडी, नारळ लढविणे, उखाणे स्पर्धा, गणेशोत्सव स्पर्धेत उजळाईवाडी मानाचा राजा, सर्वोत्कृष्ट मूर्ती, सर्वोत्कृष्ट सजीव देखावा, सर्वोत्कृष्ट परिसर स्वच्छता, पारंपरिक पध्दतीने गणेशविसर्जन आदी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविले. स्पर्धेचे उद्‌घाटन अरूणिमा माने (माजी पं. स. सदस्या), तामगावच्या सरपंच सुरेखा हराळे, ग्रा. पं. सदस्य मेघा आडनाईक यांच्या हस्ते केले. यावेळी उखाणे स्पर्धेत स्वाती निर्मळे, आशा जगताप, मेघा पाटील, पौर्णीमा सूर्यवंशी, अर्चना आळवेकर, स्वाती सासणे यांनी क्रमांक पटकाविला. 
कार्यक्रमास अरूणिमा  माने, राजू माने, नगरसेविका भारती पवार, अरविंद मोंडकर, ॲड. अमृता  मोंडकर, गीता नेवाळे, विद्या फर्नांडिस, गोशिमा अध्यक्ष दीपक चोरगे, प्रदीप दुगाणे, स्पर्धा परीक्षक आनंद गिरी, मिलींद शिंदे, अनंत यादव, राजमाला डकरे, ताज मुल्लाणी उपस्थित होते. मंजिरी देवान्नार यांनी सूत्रसंचालन केले.