कणेरी येथे चिकित्सा शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणेरी येथे चिकित्सा शिबीर
कणेरी येथे चिकित्सा शिबीर

कणेरी येथे चिकित्सा शिबीर

sakal_logo
By

कणेरी येथे चिकित्सा शिबीर
उजळाईवाडी, ता. ३ : श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी येथे मोफत रुग्ण चिकित्सा शिबीर आयोजित केले आहे. वैद्य महासभा केरळ व सिद्धगिरी आयुर्धम कणेरीतर्फे नॅशनल स्किल डेव्हलोपमेंट अंतर्गत ही १० दिवसीय निवासी, केरळीय पारंपरिक चिकित्सापद्धती कार्यशाळा सुरू असून ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात १०० प्रशिक्षनार्थींना विविध केरळीय पारंपरिक चिकित्सा पद्धतीच प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. दरम्यान, ४ ते ६ नोव्हेंबर सेरेब्रल पाल्सी, ऑटिसम व तत्सम लहान मुलांचे मेंदूचे आजार असणाऱ्या मुलांसाठी शिबिरात उपचार दिले जाणार आहेत. शिबीर मोफत असून केरळमधील पारंपरिक चिकीत्सा पद्धतींचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन कणेरी मठातर्फे करण्यात आलेले आहे.