गोकुळ शिरगावात ट्रकच्या धडके दुचाकी स्वार जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ शिरगावात ट्रकच्या धडके दुचाकी स्वार जखमी
गोकुळ शिरगावात ट्रकच्या धडके दुचाकी स्वार जखमी

गोकुळ शिरगावात ट्रकच्या धडके दुचाकी स्वार जखमी

sakal_logo
By

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
उजळाईवाडीः गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील मेनन बेअरिंग कंपनीसमोरील रस्त्यावर आज सकाळी पावणेआठला ट्रकने पाठीमागून धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ट्रकचालक योगेश भागवत जायभाई (वय २३, शिंद्री सुनेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रकने (एमएच २४-एबी ७६६२) दुचाकी (एमएच ०९-ए एच ४३९८) वरून जाणाऱ्या बाळू बापू चौगुले (५४, एकोंडी,ता. कागल) यांना पाठीमागून जोराची धडक दिली. अपघाताची फिर्याद वसंत बळवंत कुंभार (उजळाईवाडी) यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांत दिली. ट्रकचालक योगेश जायभाई याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. हेडकॉन्स्टेबल इदे अधिक तपास करत आहेत.