पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न
पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न

पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

सांगवडेवाडीत पत्नीला
पेटवून मारण्याचा प्रयत्न
रिमोट सरकवल्याचा राग; तरुणावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी, ता. १२ ः किरकोळ कारणातून सांगवडेवाडी (ता. करवीर) येथे आज एकाने पत्नीस बेदम मारहाण करीत तिच्यावर रॉकेल ओतून व पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी घडला. जीवघेण्या हल्ल्यातून सौ. पूनम किशोर शिंदे (वय २८) सुदैवाने वाचल्या तरी त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. गोकुळ शिरगाव पोलिसांनी याप्रकरणी पती किशोर याच्यावर आज गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री दहा वाजता पूनम घरी मुलांसोबत टीव्ही पाहत बसल्या होत्या. त्याच वेळी संशयित किशोरने त्यांच्याकडे टीव्हीचा रिमोट मागितला. त्यांनी रिमोट किशोर यांच्याकडे सरकविला. यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला. किशोरने रागातच दरवाजा बंद करून पत्नीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात पूनम यांच्या ओठाला जखम झाली. त्यानंतर त्याने पूनम यांच्या अगावर रॉकेल ओतून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रॉकेल ओतल्यानंतर संशयित काडेपेटी शोधण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला काडेपेटी सापडली नाही, परंतु त्याला रॉकेलचा उग्र वास सहन न झाल्याने त्याने दरवाजा उघडला. प्रसंगावधान राखत पूनम घराबाहेर धावल्यामुळे या थरारक घटनेतून केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावल्या. पूनम यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रणाली पवार तपास करीत आहेत.