Wed, May 31, 2023

महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार
महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार
Published on : 22 February 2023, 4:46 am
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
उजळाईवाडी ः पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जाजल पेट्रोल पंपासमोर ट्रक (क्र.एम एच ११ ए एल १३२१) ने दुचाकी (क्र. एम एच ०९ सी एक्स २३६५) ला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात शिवाजी शामराव भराडे (वय ४५,रा. करंजिवणे, ता. कागल) हा दुचाकीस्वार ठार झाला. तर आत्माराम बापूसो पाटील (वय ६५, रा. यमगे, ता. कागल) हे जखमी झाले. हा अपघात बुधवारी (ता. २२) दुपारी तीनच्या दरम्यान झाला. निष्काळजीपणे वाहन चालवीत अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक ड्रायव्हर सागर शामराव ढेरे (वय ३७, ठिकपुर्ली तर्फ ढेरेवाडी, ता. राधानगरी) याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास सहायक फौजदार तिवडे करीत आहेत.