
सलग दोन दिवस सुट्ट्यांमुळे कणेरीमठ हाऊस फुल्ल
3207
गोकुळ शिरगाव ः येथील कणेरी फाटा येथे सुमंगलम् महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गर्दी मोठी गर्दी होत होती.
(छायाचित्र ः महादेव वाघमोडे)
...
सलग दोन दिवस सुट्यांमुळे
कणेरी मठावर मोठी गर्दी
उजळाईवाडी, ता. २६ ः कणेरी (ता. करवीर) येथील सुमंगलम् पंचमहाभूत महोत्सवासाठी काल (ता. २५) व आज सलग दोन दिवस सुट्या असल्याने भाविक व पर्यटकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली. तसेच, यामुळे उत्सव मार्गाबरोबरच पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरही वारंवार वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत होती. परंतु, प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे संथगतीने का असेना, पण वाहतूक सुरळीत होत होती. कणेरी येथील सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण जागृतीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरलेल्या या महोत्सवाला सर्वच स्तरांतील लोकांबरोबरच विद्यार्थ्यांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली. काल व आज सुट्या असल्याने या महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी प्रचंड वाढलेली पाहायला मिळाली. दोन दिवसांपासून गोकुळ शिरगाव येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कणेरी फाटा येथे प्रचंड प्रमाणात वाहने येत असल्याने वाहतुकीची वारंवार कोंडी होत होती. परंतु, पोलिस प्रशासनाने उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक व्यवस्था केल्याने व गोकुळ शिरगाव एमआयडीसी तसेच कागलकडे जाणारी वाहतूक गोकुळ शिरगावमार्गे वळविण्यात आल्याने वाहतूक ठप्प न होता संथगतीने वाहतूक सुरू होती. कणेरी, गोकुळ शिरगाव व कंदलगाव येथील विस्तीर्ण जागेवर प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आलेली होती व हे पार्किंगही फुल्ल झाल्याचे पाहायला मिळत होते.
....