
शून्य अपघात सप्ताह निमित्त महामार्ग पोलिस केंद्राच्या वतीने प्रबोधन
03230
उजळाईवाडीत वाहतूक नियम जनजागृती
उजळाईवाडी, ता. ११ : औद्योगिक सुरक्षा (शून्य अपघात) सप्ताहानिमित्त उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या वतीने वाहनधारक, प्रवासी, कंपनी कामगार यांना वाहतूक नियमांचे पालन व घ्यावयाची दक्षता याबाबत प्रबोधन व जनजागृती केली. यावेळी उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्रातील सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत शेडगे यांनी वाहनचालकांना अपघातावेळी घ्यावयाची काळजी, प्रथमोपचाराविषयी मार्गदर्शन केले.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हा कार्यक्रम झाला.
अप्पर पोलीस महासंचालक सारंगल, पुणे प्रादेशिक विभाग पोलिस अधीक्षक लता फंड, पोलिस उपअधीक्षक राजन सस्ते, पोलिस निरीक्षक प्रीती शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे वाहतूक सुरक्षा सप्ताह झाला. यावेळी उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कविता नाईक, पोलिस उपनिरीक्षक सुनील माळगे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र नुल्ले, शंकर कोळी यांच्यासह महामार्ग मृत्युंजय दुत, युवा ग्रामीण विकास संस्था स्थलांतरित कामगार लक्ष्य गट हस्तक्षेप प्रकल्प गोकुळ शिरगाव येथील कर्मचारी उपस्थित होते.