
तहानलेल्या नवभारत सोसायटीची उपेक्षा संपणार
नवभारत सोसायटसाठी लवकरच जलवाहिनी
पाणीपुरवठा करण्याबाबत हालचाली;उजळाईवाडीत सरपंच, पदाधिकाऱ्यांची पाहणी
उजळाईवाडी, ता. १४ ः येथील कोर्ट कॉलनीतून नवभारत सोसायटी व विस्तारीत वसाहतींसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी सरपंच उत्तम आंबवडे, पदाधिकाऱ्यांनी पाहणी करत लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
बऱ्याच दिवसांपासून स्थानिकांकडून याबाबत मागणी करण्यात येत होती. परंतु, त्यातील कोर्ट कॉलनीतून नवभारत सोसायटीकडे पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन उपलब्ध नव्हती. यासाठी तेथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला अनेकदा विनंती केली होती.त्या अनुषंगाने आज सकाळी सरपंच आंबवडे यांनी नागरिकांचे म्हणणे समजावून घेतले. प्रदीप पाटील यांनी स्वागत केले. डी. के. पारधी, श्रीकांत पोवार यांनीही अडचणी सांगितल्या. ग्रामपंचायत सदस्य संदीप माने, सुनील गुमाने, आदित्य दळवी, जमादार उपस्थित होते.
याबाबत ‘सकाळ''ने अनेकदा बातम्यांतून पाठपुरावा केला होता.
प्रश्न मार्गी लागणार
नवभारत सोसायटीचे अध्यक्ष आर बी शिंदे, सुधाकर वाणी, प्रणव वाणी, राजू वाडकर यांच्याकडून ग्रामपंचायत व आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. सदर जलवाहिनीमुळे परिसरातील नागरिकांचा पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.
कोट
नवभारत सोसायटी व परिसरातील कॉलनीमधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. दोन महिन्यात या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-उत्तम आंबवडे, सरपंच