उजळाईवाडीत बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उजळाईवाडीत बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास
उजळाईवाडीत बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास

उजळाईवाडीत बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास

sakal_logo
By

पावणेदोन लाखांचा ऐवज उजळाईवाडीतून लांबविला

उजळाईवाडी, ता १८ ः येथील तुळजाभवानीनगरमधील अनंत विद्यासागर नाडगे (मूळ गाव ढोणेवाडी, ता निपाणी, जि. बेळगाव) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ८७ हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्यांसह ऐवज लांबविला. नाडगे यांनी याबाबतची फिर्याद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत माहिती अशी ः नाडगे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने आज पहाटे कपाटातील दागिन्यांसह इतर ऐवज चोरून नेला. यामध्ये १ लाख २० हजारांचे अंदाजे तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, १६ हजार रुपये किमतीच्या दोन रिंगा, ४० हजारांची रस्सी चेन, सहा हजारांची अंगठी, पाच हजारांचा चांदीचा आरती सेट, दहा हजारांचा कॅमेरा असा एकूण
एक लाख ८७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची फिर्याद नाडगे यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने करीत आहेत.
.............................