Tue, June 6, 2023

सांगवडेवाडी येथे खनिज पडून जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
सांगवडेवाडी येथे खनिज पडून जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
Published on : 18 March 2023, 6:58 am
खणीत पडलेल्या
जखमी वृद्धाचा मृत्यू
उजळाईवाडी ः सांगवडेवाडी (ता. करवीर) येथील एका पेट्रोल पंपालगत असलेल्या दगडी खाणीत काल (ता. १७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पडून वसंत पांडुरंग जगदाळे (वय ७०, सायबर रोड, शाहूनगर, कोल्हापूर) जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सीपीआर पोलिस चौकीचे हेड कॉन्स्टेबल हेगडे-पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांना फोनद्वारे दिली.