कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची दीड लाखाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची  दीड लाखाची फसवणूक
कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची दीड लाखाची फसवणूक

कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची दीड लाखाची फसवणूक

sakal_logo
By

२५ लाख कर्जाच्या आमिषाने
दीड लाखाची फसवणूक

संतोष पाटीलविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

उजळाईवाडी, ता २० ः गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील एका बँकेतून २५ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून मारुती राजाराम पाटील (वय ५०, रा. वंदूर, ता. कागल) यांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष रंगराव पाटील या ठकसेनाविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संतोष पाटीलने आणखी तिघाजणांना साडेसहा लाखांना गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जानेवारी २२ ते ३१ मार्च २२ या काळात वेळोवेळी गोकुळ शिरगाव येथील एका बँकेसमोर असलेल्या चहाच्या टपरीवर भेट घेऊन संशयित आरोपी तोष पाटील आपण बँकेत नोकरीला असल्याचे सांगत होता. बँकेचे ओळखपत्र दाखवून २५ लाख रुपये कर्ज मिळवून देण्यासाठी आजपर्यंत दीड लाख रुपये घेतल्याची फिर्याद मारुती पाटील यांनी दिली आहे. कर्ज मंजूर झाल्याबाबतचे खोटे कर्ज मंजुरीपत्र दाखवून जवळपास दीड लाख रुपये टप्प्याटप्प्याने मारुती पाटील यांच्याकडून उकळले. त्यानंतरही कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यानंतर फसवणूक झाल्याचे मारुती पाटील यांच्या लक्षात आले. अखेरीस त्यांनी संशयित संतोष पाटीलविरोधात आज गोकुळ शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांच्यासह सहायक फौजदार तिवडे व कॉन्स्टेबल इदे करीत आहेत.