(सुधारित)सांगवडेवाडीत परप्रांतीयाचा गळा आवळून खून

(सुधारित)सांगवडेवाडीत परप्रांतीयाचा गळा आवळून खून

सांगवडेवाडीत परप्रांतीयाचा
गळा आवळून खून

एका अल्पवयीनासह तिघांना अटक


उजळाईवाडी, ता. ११ ः सांगवडेवाडी (ता. करवीर) येथील ज्योतीराम दत्तू चव्हाण यांच्या शिवचा मळा येथील शेतातील विहिरीत औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगार अनुराग राजेश कुशवाह (वय १९, सध्या रा हलसवडे ता. करवीर, मूळगाव भैस्की पो. सैदाबाद ता. हंडीया जि. प्रयागराज उत्तर प्रदेश) या युवकाचा १० मे रोजी पहाटेच्या सुमारास गळा आवळून खून करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी खून केल्यानंतर विहिरीत टाकण्यात आला. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.
खुनातील सहभागाच्या संशयावरून सौरभ बाबुराव पाटील ( वय २१ ) , संग्राम सदाशिव जाधव (वय २६) (दोघे रा. शिरपेवाडी ता. चिकोडी) सह एका अल्पवयीन मुलगा असे तिघांना गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे .
सरकारतर्फे गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास या ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com