बेलेवाडी पोलिस पाटील पद तत्काळ भरण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेलेवाडी पोलिस पाटील पद तत्काळ भरण्याची मागणी
बेलेवाडी पोलिस पाटील पद तत्काळ भरण्याची मागणी

बेलेवाडी पोलिस पाटील पद तत्काळ भरण्याची मागणी

sakal_logo
By

बेलेवाडी पोलिसपाटील पद
तत्काळ भरण्याची मागणी
विद्यार्थ्यासह नागरिकांची होतेय गैरसोय
उत्तूर, ता. ४ ः बेलेवाडी (ता. आजरा) येथील पोलिसपाटील पद रिक्त आहे. गेली दहा वर्षे हे पद चर्चेत राहिले आहे. रिक्त पद तत्काळ भरावे व विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.
२०१० साली पांडुरंग तोरस्कर हे पोलिस पदावरून निवृत झाले होते. त्यावेळी महसूल खात्याने जाहिरात प्रसिद्ध करून इतर मागास महिलांचे अर्ज मागविले. मेघा शिंदे व पुष्पलता शिंदे यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले. गुणाणुक्रमे पुष्पलता शिंदे यांची निवड झाली, मात्र मेघा शिंदे यावर हरकत घेतली. हा घोळ वर्षभर चालला. यानंतर पुष्पलता शिंदे यांची नियुक्ती झाली. पाच वर्षांहून अधिक काळ त्या या पदावर राहिल्या. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला. तो महसूल विभागाने मंजूर केला. सध्या या गावचा पदभार चार किमीवर असलेल्या धामणे गावचे पोलिसपाटील भूपाल पाटील यांचेकडे आहे. पोलिसपाटील नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे पद तत्काळ भरावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02008 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top